आज असेच एक पुस्तक वाचून संपले अन त्यात दुसऱ्या विश्वयुध्याचा पाठपुरावा केला होता । युध्याच्या गोष्टी एकतना जसे आपन संपूर्ण रमुन जातो तीच गत माझी झाली होती। त्यात हिटलरचा पराक्रम असामान्यच होतां हे कळले अन तो किती क्रूर होता याचेही बोध झाले। परंतु युध्यात ज्य पद्धातिने जीवित हानि झाली व संपूर्ण जगाने ज्या यातना सोसल्या हे माज़्या डोक्यातून न जाण्यासारखे झाले। शेवटी प्रश्न पडला की या संपूर्ण विध्वंसला फक्त हिटलरच जवाबदार आहे का ? तर मनातून उत्तर आले नाही । माला वाटते ज्य पद्धतीने ब्रिटिश , फ्रांस व डच या देशांनी जगात आपापल्या वसाहती निर्माण करून ठेवल्या होत्या व त्या निमित्ताने ते जगावर राज्य करत होते त्याच पद्धतीची भावना हिटलरच्या मनात आली व ती पूर्ण करण्यासाठी त्याने कही पवले उचलली तर त्यात गैर काय। मला वाटते की यूरोपेने जगाला युद्ध आणि अशांति याहून जस्ता काही दिले नाही । २ऱ्या विश्वयुधात जवळपास ३ टक्के जागतिक लोकसंख्येचा विध्वंस झाला ; मग फक्त याला हिटलरलाच सर्वस्वी जवाबदार धरून चालणार नसून याला युरोपच्या इतर देशांचा विस्तारवादी धोरणही कारणीभूत आहे।याची जर सुरवतीपासून दखल घ्यायची ठरली तर त्याची सुरुवात होते १५व्य शतकपासून, जेव्हा यूरोपमधे नविन जगाचा शोध घ्यायची सुरुवात झाली व तेथील लोक जहाज घेऊन लांबचे पल्ले गाठु लागले। त्यातूनच अमेरिका ,दक्षिण अफ्रीका व आशिया खंडाचा शोध लागला। सुरुवातीला व्यापारी म्हणून आलेले हे लोक हळूहळू आपले पाय तेथे रोऊ लागले। नंतर तर त्याना सीमाच राहिली नही, त्यानी ज्या प्रदेशात आपल्या वसाहती वसवायला सुरुवात केली होती तो संपूर्ण प्रदेशच स्वताच्या मलकीचा करून घेतला। तेथील जनतेवर अमानुष अत्त्याचार केला अन त्यांना भिकारी करूनच सोडले। यतुन जो पैसा आला तो त्यानी स्वताच्या देशाला सक्षम बनवण्यासाठी उपयोगी आणला। यूरोपियन देशांमधे colonies निर्माणकारण्याची स्पर्धा लागली अन इथेच विश्वयुद्धाची बी पेरलीगेली अस मला वाटते। त्यातूनच विश्वयुद्ध १ ची सुरुवात आहे। विश्वयुद्ध १ मधला जर्मनीचा पराभव व त्यातून जर्मनीवर लादण्यात आलेली सक्ती अन जर्मनीच्या लोकांमधे पसरलेली सन्तापाची लाट हे हिटलरसाथी स्पर्धेत उतरण्यासाठी पुरेसे होते। लगेच स्पर्धेचे दूसरे पर्व १९३९ साली सुरु झाले।याच स्पर्धेमधे हिटलरने आपला सहभाग नोंदवला अन संपूर्ण जग पुन्हा युध्याच्या छायेखाली वावरु लागले। सुरुवातीला हिटलरने ब्रिटेन सोडून जवळजवळ बराचसा यूरोप गिळंकृत करून घेतला, वाटेल तेवढी हानि पोहोचवायचे त्याने ठरवले अन, जर्मनीने संपूर्ण विश्वावर राज्य करण्यासाठीच जन्म घेतला आहे अस त्याला वटु लागले। त्याने जापान व इटली दोघ देशाना आपल्या बाजूने करून संपूर्ण विश्वाचा बिमोड़ करण्याचे ठरवले।
विश्वयुद्ध २ हे लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असेच होते परंतु स्टॅलिन (रूस ) याला अपवाद ठरला तो ;सुरुवातीला जरी हिटलरकडून असला तरी शेवटी जर्मनीचा पराभव करण्यासाठी त्याने लोकशाहीची (अमेरिका ,ब्रिटिश ) साथ दिली। परंतु युद्ध संपूण देखील सर्वत्र शांतता पसरली नव्हती अजुन शीतयुद्धला सुरुवात व्हायची होती। अमेरिकेला हिटलरला संपवायला जरी यश आले असले तरी स्टॅलिन अजुन संपलेला नव्हता , हुकूमशाही अजुनही आपला लाल रंग सर्वत्र पसरवत होती अन त्याला आवर घालण्यासाठी अमेरिकेने जो प्रयत्न केला त्यातच आतंकवादची निर्मिति आहे। येथे कळायला अवघड़ आहे की नक्की अशांततेला कारणीभूत हुकूमशाही (स्टालिन ,हिटलर ,मुसोलिनी ,जापान ) आहे की लोकशाही (अमेरिका ,ब्रिटेन ,फ्रांस ) ।
अशांततेला कारणीभूत जग सर्वस्वी हुकुनशाहिला मानते ।अजुनसुद्धा उत्तर कोरिया व चीन सारख्या हुकुमतशाही देशांना जग पुढील युद्धाचा केंद्रबिंदु मानते। हिटलरचे सांगायचे झाले तर त्यापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे। त्याचे देशाविषयी असणारे अफाट देशप्रेम , देशाभिमान ,काहीतरी करून दाखवण्याची कुवैत या सर्व गोष्टी उल्लेखनीय आहेत। त्याने जो विकास १९३४ ते १९३९ या ५ वर्षात करून दाखवले ते अजुन भारताला साध्य करता आलेले नाही। त्याचे स्वप्न व धाडस असामान्य होते। परंतु काही जे मार्ग त्याने अवलंबले ते विनाशकारी होते अन शेवटी तेच झाले। संपूर्ण यूरोपेचा विनाश झाला अन त्याच्या झळा जगाच्या कान्यकोपऱ्यात पोहोचल्या। यावरून लक्ष्यात येते की अमेरिकासारखे लोकशाही देशच् शांतता पसरु शकता परंतु ते कितपर खर आहे हे सांगणे थोड़े अवघड आहे।
अमेरिका जर स्वताला डेमोक्रेटिक व रिपब्लिक मानत असेल अन लोकांच्या हिताचे व अधिकाराचे विचार करत असेल तर त्याना अफ्रिकेतून तस्करी करून आणलेल्या मनुष्यांची सुटका करायला एवढा वेळ का लागला ? ते मनुष्य असून देखील त्याना सर्व अधिकारांपासून वंचित का ठेवण्यात आले ? अमेरिकेकडून ईरान व इराक मधे ज्या पद्धतीने नरसंहार करण्यात आला याला काय म्हणावे ? ब्रिटेन अन फ्रांसला जर हुकूमशाहीची चीड़ होती तर १५व्या शतकपासून ज्या वसहतींवर ते हुकूमत करत होते ती काय लोकशाहीचा प्रकार होता का ? या सर्व बबीतुन एवढ लक्ष्यात येते की सर्व आपापले स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत होते व जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने आपले पावल पुढे रटत होते। अन त्यात अमेरिकेने बाजी मारली। विश्वयुद्धाचा फायदा गुलमगिरित वावरत असणाऱ्या एशियाई व अफ़्रीकी देशांना झाला,संयुक्त राष्ट्राच्या आदेशानुसार त्यांना स्वतंत्र देण्यात अले। अजुन पुढचे युद्ध जागतिक महासत्ता बनण्याचा दृष्टीनेच होईल व त्यातला भारताचा अन चिनचा सहभाग निर्णायक ठरणार एवढे खरे ।